३१ मे या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तिथीनुसार जयंती झाली. त्या निमित्ताने …
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! चालू वर्ष हे हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी ७४ वे वर्ष आहे. सावरकर विरोधकांना मान्य नसले, तरी स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान शब्दातीत आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतांना त्यांना अपेक्षित असलेले ‘स्वराज्य’ प्रस्थापित करण्याची आपण प्रतिज्ञा करूया.
– श्री. श्रीकांत ताम्हनकर, पुणे
तेच स्वराज्य की, ज्यात हिंदूंचे स्वत्व संरक्षित आणि वृद्धिंगत होऊ शकते. ज्या स्वराज्यासाठी आमच्या पिढ्यान्पिढ्या आम्ही हिंदु लोक झटत आणि झुंजत आलो, ते स्वराज्य म्हणजे या हिंदुस्थानात हिंदूंना आपले हिंदुत्व न गमावता आपल्या हिंदु संस्कृतीचा ध्वज विजयानंदाने फडकवीत ठेवता येईल, असे भारतीय साम्राज्य होय.
(साभार : श्रद्धानंद – हिंदुत्वाचे पंचप्राण – २ जून १९२७)