वाढत्या घटस्फोटांमुळे विवाहापूर्वी समुपदेशन बंधनकारक करणार ! – नीलेश काब्राल, कायदामंत्री

घटस्फोटाची प्रकरणे ही आतापर्यंत जनतेला साधना न  शिकवल्याचा विपरीत परिणाम आहे. एकत्र कुटुंबपद्धत उद्ध्वस्त होणे, मर्यादाबाहेर स्वातंत्र्य, स्वैराचार ही त्यामागील अन्य काही कारणे आहेत.

नीलेश काब्राल

पणजी, ३१ मे (वार्ता.) – राज्यात घटस्फोट घेण्याचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी राज्यशासन विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी यांचे समुपदेशन करणे बंधनकारक करणार आहे, अशी माहिती कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

कायदामंत्री नीलेश काब्राल पुढे म्हणाले, ‘‘विवाहाची अंतिम नोंदणी होण्यापूर्वी मुलगा आणि मुलगी यांचे एका संस्थेच्या मार्फत समुपदेशन करण्यात येणार आहे. विवाह नोंदणीची पहिली स्वाक्षरी झाल्यानंतर समुदेशन करण्यात येणार आहे आणि समुदेशन झाल्यानंतर देण्यात येणारा दाखला हा अंतिम नोंदणी करण्याच्या प्रक्रियेचा एका भाग असेल.’’