इन्सुली (बांदा) आणि विलवडे येथे लाखो रुपयांच्या अवैध मद्यासह तिघे जण पोलिसांच्या कह्यात

प्रातिनिधिक चित्र

सावंतवाडी – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने इन्सुली येथील पोलीस तपासणी नाक्यावर केलेल्या कारवाईत ५ लाख ५४ सहस्र ४०० रुपये मुल्याच्या गोवा बनावटीच्या अवैध मद्यासह १० लाख रुपये मुल्याचे चारचाकी वाहन आणि ३० सहस्र ३०० रुपये मुल्याचे अन्य साहित्य मिळून एकूण १५ लाख ८४ सहस्र ७०० रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. तसेच पोलिसांनी या प्रकरणी दोघांना कह्यात घेतले आहे.     त्याचप्रमाणे तालुक्यातील विलवडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ३० मे या दिवशी एका स्विफ्ट कारवर कारवाई केली. या कारवाईत पथकाने  २६ लाख ४ सहस्र रुपये मुल्याचे गोवा बनावटीचे अवैध मद्य, मद्य वाहतुकीसाठी वापरलेली कार आणि चालक यांना कह्यात घेतले.

‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गोवा-महाराष्ट्र या राज्यांच्या सीमा बंद असतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात सातत्याने अवैध मद्याची वाहतूक होते कशी ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.