माणूस स्वत:ला वाचवू शकणार नसल्याने आता आपल्याला देवाच्या साहाय्याची आवश्यकता ! – मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक यांचे आवाहन

ख्रिस्ती आरोग्यमंत्र्यांच्या हे लक्षात आले आहे; आता भारतातील हिंदु मंत्र्यांच्या हे लक्षात कधी येणार ?

मेघालयचे आरोग्यमंत्री अलेक्झांडर हेक

शिलाँग (मेघालय) – मनुष्यप्राणी स्वत:ला वाचवू शकणार नाही. आता आपल्याला देवाच्या साहाय्याची, त्याच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे, देवाविना आपण कुणीच नाही. जगभरात या (कोरोना) आजाराचा सामना करणार्‍या सर्वांना केवळ पवित्र संरक्षणच वाचवू शकेल, असे विधान मेघालयचे आरोग्यमंत्री आणि भाजपचे नेते अलेक्झांडर हेक यांनी कोरोनाच्या वाढत्या संकटावर केले आहे. तसेच त्यांनी ३० मे या दिवशी दुपारी १२ वाजता सर्वांना घरी ईश्‍वराची प्रार्थना करण्याचे आवाहनही केले होते. मेघालय सरकारने त्यासंदर्भात परिपत्रकच काढले होते. मुख्यमंत्री कॉनरेड संगमा यांनी याला अनुमती दिली होती.

मेघालयमध्ये सध्या ८ सहस्र २५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ सहस्र ८३५ इतकी आहे. १ एप्रिल या दिवशी राज्यात केवळ ४९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण होते, तर एकूण बाधितांचा आकडा १४ सहस्र होता. एकूण ३३ लाख लोकसंख्या असलेल्या मेघालयमध्ये कोरोनामुळे आजपर्यंत ५४४ मृत्यू झाले आहेत.