कॅनडात चर्चशासित शाळेच्या परिसरात पुरण्यात आलेल्या २१५ मुलांचे मृतदेह सापडले !

१९ व्या शतकापासून १९७० च्या दशकापर्यंत ख्रिस्ती होण्यास नकार देणार्‍या स्थानिक जमातीच्या मुलांवर अत्याचार !

ख्रिस्त्यांच्या चर्चमध्येच नव्हे, तर शाळेतही लहान मुलांवर अत्याचार होतात, हे लक्षात घ्या ! अशा घटनांविषयी भारतीय प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मौन बाळगतात; कारण त्यांना असले ख्रिस्ती धर्मनिरपेक्ष वाटतात !

कॅमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूल

कॅमलूप्स (कॅनडा) – येथील कॅमलूप्स इंडियन रेसिडेंशियल स्कूलच्या परिसरात २१५ लहान मुलांचे मृतदेह भूमीत पुरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. भूमीच्या आतमध्ये असणार्‍या वस्तूंचा शोध घेणार्‍या रडारला हे मृतदेह आढळून आले. ही शाळा एकेकाळी कॅनडामधील सर्वांत मोठे विद्यालय होते. याठिकाणी आणखी मृतदेह आढळू शकतात; कारण शाळेच्या पटांगणाची आणि इतर काही भागांची पहाणी अद्याप शेष आहे. १९ व्या शतकापासून १९७० च्या दशकापर्यंत दीड लाखांहून अधिक मुलांना शासकीय अनुदानीत ख्रिस्ती शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत असे. तेथील स्थानिक जमातीच्या मुलांना धर्मपरिवर्तन करून ख्रिस्ती होण्यास भाग पाडले जात असे. त्यांना त्यांची मातृभाषा बोलण्याची अनुमती  नव्हती. अनेक मुलांना मारहाण आणि शिवीगाळही केली जात. या काळात अत्याचारांमुळे ६ सहस्र मुलांचा मृत्यूही झाला होता, असे सांगितले जाते. याविषयी वर्ष २००८ मध्ये कॅनडाच्या सरकारने क्षमाही मागितली होती आणि शाळांमध्ये शारीरिक अन् लैंगिक शोषणांचे आरोपही मान्य केले होते. ही शाळा वर्ष १९७८ मध्ये बंद झाली. चर्चने मुलांवर केलेल्या या अत्याचारांविषयी क्षमा मागावी, अशी समाजातून मागणी होत आहे.