भारतीय जन महासभेकडून केंद्रीय मंत्र्यांकडे कारवाईची मागणी

इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांचा अवमान !

प्रतिकात्मक छायाचित्र

जमशेदपूर (झारखंड) – इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांच्या चित्रांसहित अश्‍लील लिखाण पोस्ट केल्याच्या प्रकरणी येथील भारतीय जन महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष धर्मचंद्र पोद्दार यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना यावर कारवाई करण्याची मागणी ट्वीट करून केली आहे. (वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून कारवाई करणे आवश्यक ! – संपादक) पोद्दार यांनी सांगितले की, ८ मासांपूर्वी एक यु ट्यूब चॅनल बनवून त्यावर हिंदूंच्या देवतांची अश्‍लील चित्रे प्रसारित करण्यात आली होती. याविषयी येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर ती हटवण्यात आली होती; मात्र आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. आता इन्स्टाग्रामवर अशाच पद्धतीने देवतांचा अवमान करण्यात आला आहे.