सातारा – कोरोनाच्या काळातही आशा आणि गटप्रवर्तक आरोग्य धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्यासाठी कोणत्याही सोयी-सुविधा शासनाकडून दिल्या जात नाहीत. या कामाचे मानधनही त्यांना वेळेत दिले जात नाही, असा आरोप करत २४ मे या दिवशी आशा आरोग्यसेविका आणि गटप्रवर्तक यांनी एक दिवस देशव्यापी लाक्षणिक संप केला. हा संप यशस्वीरित्या पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र आशा आणि गटप्रवर्तक फेडरेशनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे यांनी दिली.