कुडाळ पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजितकुमार पाटील यांची आत्महत्या

कॉन्स्टेबल अजितकुमार पाटील

कुडाळ – येथील पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल अजितकुमार बाळकृष्ण पाटील (वय ४२ वर्षे, मूळ रहाणार वाळवा, जिल्हा सांगली) यांनी २३ मे च्या रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. ६ वर्षांपूर्वी पाटील पोलीस सेवेत रूजू झाले होते. जिल्हा पोलीस मुख्यालयात सेवा केल्यानंतर गेली ३ वर्षे ते कुडाळ पोलीस ठाण्यात कार्यरत होते.