१. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून नामजपाचे महत्त्व समजल्यावर नामजपाला आरंभ करणे आणि त्यामुळे ‘ईश्वर सदैव समवेत आहे’, याची जाणीव होऊ लागणे
‘सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे माझ्या जीवनात जे पालट झाले आहेत, त्यांचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. माझ्या जीवनात ‘दुःखाव्यतिरिक्त आणखी काही येऊच शकत नाही’, अशी माझी स्थिती होती. कोरोना महामारीच्या काळात मी सत्संग ऐकू लागलो आणि हळूहळू नामजप चालू केला. त्यामुळे ‘ईश्वर माझ्या समवेत सदैव आहे’, याची मला जाणीव होऊ लागली. जी व्यक्ती नामजप करील, तिचे त्रास दूर होऊन तिचे जीवन आनंदमय होईल. त्या व्यक्तीला त्रास सोसण्याचे बळ मिळेल.
२. ‘ऑनलाईन’ सत्संगाच्या माध्यमातून हिंदु धर्माविषयी माहिती मिळून जीवन आनंदी होणे
या सत्संगाच्या माध्यमातून मला हिंदु धर्माविषयी पुष्कळ माहिती मिळाली. त्यामुळे माझे जीवन आनंदी झाले. आमच्यासारख्या लक्षावधी लोकांच्या जीवनाचा त्यांनी उद्धार केला आणि आम्हाला आनंदाचे क्षण दिले. त्यासाठी मी सनातन संस्थेचे आभार मानतो. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी नमस्कार !’
– श्री शैलेंद्र सिंह, जालौन, उत्तरप्रदेश. (१.१.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |