पुणे – कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र म्युकरमायकोसिस या आजारावर प्रभावी असणार्या इंजेक्शनचा तुटवडा अद्यापही दूर झालेला नाही. बाजारातील तुटवड्यामुळे यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शनप्रमाणे या इंजेक्शनचे नियंत्रण जिल्हाधिकार्यांकडे द्यावे, अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकार्यांना ३ दिवसांपूर्वीच दिले होते; मात्र अद्यापही जिल्हाधिकारी, तसेच अन्न आणि औषध प्रशासनाकडून यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. औषधे उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांची गर्दी झाली होत आहे.