घोटाळेबाजीला आळा घालण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देऊन नैतिकता शिकवणे आवश्यक !
पुणे – पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील अमनोरा सिटी कॉर्पोरेशन आस्थापनामध्ये त्यांच्याच आशिष शेळके या कर्मचार्याने ४० ते ५० लाखांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सुनील तरटे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. सध्या आरोपी पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी शेळके हा २०११ ते २०२० या कालावधीत विविध अधिकोषांकडून आस्थापनाला मिळणारी कमिनशची रक्कम आस्थापनाच्या खात्यावर जमा न करता व्यवस्थापक अतुल गोगावले यांच्या नावाने इतर अधिकोषांमध्ये बनावट खाती उघडून त्यात ती रक्कम जमा करत होता. ती रक्कम तो स्वत:साठी वापरत होता. हा प्रकार गेली १० वर्षे चालू होता.