इस्रायलने आतंकवादी संघटना ‘हमास’च्या वरिष्ठ नेत्याचे घर केले उद्ध्वस्त !

पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींची जो बायडेन यांना युद्ध थांबवण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती !

इस्रायल आतंकवाद्याचे घर उद्ध्वस्त करून त्याच्यावर कशी दहशत निर्माण करतो, याचे हे उदाहरण होय !

जेरूसलेम (इस्रायल) – इस्रायलच्या सैन्याने गाझा पट्टी येथील हमास या आतंकवादी संघटनेच्या वरिष्ठ नेत्याच्या घरावर आक्रमण करून ते उद्ध्वस्त केले.  येहियेह सिनवार असे त्याचे नाव आहे. इस्रायलच्या आक्रमणात आतापर्यंत हमासचे २० आतंकवादी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर इस्रायलच्या म्हणण्यानुसार ही संख्या त्याहून अधिक आहे.

पॅलेस्टाईनची अमेरिकेला विनंती !

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी दूरभाषवर चर्चा करून या प्रकरणात हस्तक्षेप करून इस्रायलचे आक्रमण थांबवण्याची विनंती केली. जोपर्यंत या भागातील इस्रायलचे नियंत्रण हटत नाही, तोपर्यंत येथे शांतता निर्माण होणे अशक्य आहे. पॅलेस्टाईन नागरिकांना शांतता हवी आहे. आम्हाला आंतरराष्ट्रीय मध्यस्थी स्वीकार आहे, असेही अब्बास यांनी स्पष्ट केले.