सांगली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५ ते १५ मे या कालावधीत सांगली जिल्ह्यात कडक दळणवळणबंदी पाळण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित होण्याचा दर ३० टक्क्यांपर्यंत स्थिर झाला आहे. हाही अधिक असल्याने सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कडक दळणवळणबंदी आणखी ३ दिवसांनी वाढवण्यात येत असून ती आता १७ मेपर्यंत असणार आहे. परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय १७ मे या दिवशी घेण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आढावा ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. जिल्ह्यात
५ मे पासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळला गेला यामुळे कोरोना रुग्णसंख्या रेट कमी झाला नसला तरी ३०%पर्यंत स्थिर झाला ही समाधानाची बाब आहे. स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. pic.twitter.com/H4WjS7S5vj— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 15, 2021