संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा !

संयुक्त उत्तरेश्‍वर पेठच्या वतीने शिवजयंती साजरा करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर – संयुक्त उत्तरेश्‍वर पेठ उत्सव समितीच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शिवजयंती सोहळा साधेपणाने साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आरोग्य निरीक्षक अरविंद कांबळे, सुनील कांबळे यांच्या हस्ते झाले. या वेळी उत्सव समितीच्या वतीने विविध मान्यवरांच्या हस्ते स्मशानभूमीतील विविध कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक अनिल गुजर यांचा शाल, श्रीफळ देऊन कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन करण्यात आले.

या वेळी समितीचे सर्वश्री किशोर घाडगे (शिवसेना), भाऊ बोडके, दीपक काटकर, विराज चिखलीकर, सुरेश कदम, विनायक साळुंके, स्वप्नील सावंत, किशोर माने, अमित बाबर यांसह अन्य उपस्थित होते.

करवीर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी

करवीर शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी करतांना श्री. राजू यादव आणि शिवसैनिक

उंचगाव – करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी श्री भवानीदेवीला देशावर आलेल्या कोरोनासारख्या महाभयंकर आजाराला परतून लावण्यासाठी देशवासियांना शक्ती आणि बळ दे, अशी प्रार्थना करण्यात आली. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, शिवसेना महिला आघाडीच्या सौ. स्वाती यादव, युवासेनेचे तालुका प्रमुख श्री. संतोष चौगुले यांसह अन्य उपस्थित होते.

कसबा सांगाव (जिल्हा कोल्हापूर) – येथे शिवप्रेमींच्या वतीने हनुमान मंदिरात शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी सर्वश्री विनायक आवळे, प्रवीण माळी, विजय आरेकर, विक्रम माने यांसह अन्य उपस्थित होते.

कसबा सांगाव येथे शिवजयंती साजरी करतांना हिंदुत्वनिष्ठ