अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने सिद्धीविनायक मंदिर, दगडूशेठ गणपति आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिर येथे आंब्यांची सजावट

श्री सिद्धीविनायक गणपती मंदिरात करण्यात आलेली आंब्यांची सजावट

मुंबई – अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने येथील श्री सिद्धीविनायक गणपति मंदिरात आंब्यांची सजावट करण्यात आली होती,

दगडूशेठ गणपतीला करण्यात आलेली हापूस आंब्यांची सजावट

तसेच पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्टच्या वतीने गणपति मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दगडूशेठ गणपतीला १ सहस्र १११ हापूस आंब्यांची आरास करण्यात आली होती.

पंढरपूर येथील मंदिरात करण्यात आलेली आमराईची सजावट

अक्षय्य तृतीयेच्या दुसर्‍या दिवशी हा आंब्यांचा प्रसाद ससून रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथेही श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या गाभार्‍यात, तसेच मंदिरात आंब्यांची नयनरम्य अशी आमराईची सजावट करण्यात आली होती.