पुणे येथील अवैध दारुभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर महिलांची दगडफेक

पुरुषांच्या बरोबरीने गुन्हेगारीत आघाडीवर असणार्‍या महिला !

पुणे – मुळशी तालुक्यातील नेरे येथे चालू असलेल्या अवैध दारूभट्टीवर धाड टाकण्यासाठी गेलेल्या हिंजवडी पोलिसांवर ११ मे या दिवशी दुपारी ४ वाजता भट्टी चालवणारे अविनाश मारवाडी, आदित्य मारवाडी आणि ३ महिला यांनी दगडफेक केली. त्यानंतर ते आरोपी तेथून पळून गेले. या प्रकरणी आरोपींवर पोलीस कर्मचारी रवीप्रकाश पवार यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (भरदिवसा गुन्हेगार पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून गुन्हेगारांना पोलिसांचा किंवा कायद्याचा धाक वाटत नाही, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? स्वतःचे ही रक्षण करू न शकणारे पोलीस जनतेचे रक्षण कसे करणार ?)