मनुष्य, प्राणी, पक्षी आणि झाडे-झुडपे यांचा परस्परांशी जवळचा संबध आहे. प्राचीन काळातील ऋषिमुनी वनामध्ये रहायचे. वनातील वनस्पतींचे, फुलांचे आणि झाडांचे महत्त्व त्यांनी ओळखले. माणसाचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि रोगराई दूर होण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या वनौषधी शोधून काढल्या. भारतीय संस्कृतीत या वनौषधींपैकी काही वृक्षांना ‘देववृक्ष’ म्हणून संबोधले जाते. त्यांमधील एक म्हणजे ‘औदुंबर’ ! अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सांगितले आहे, ‘या वृक्षाच्या मुळामध्ये ब्रह्मा, मध्यभागात विष्णु आणि अग्रभागात शिव यांचे अस्तित्व असते.’ औदुंबराची झाडे हवेमध्ये पुष्कळ अधिक प्रमाणात प्राणवायू सोडतात. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन टिकून रहाते. आयुर्वेदात औषधांच्या दृष्टीनेही औदुंबर हा पुष्कळ उपयोगी आणि महत्त्वाचा वृक्ष आहे.
गेल्या एक-दीड मासाच्या (एप्रिल २०२१ पासून आतापर्यंतच्या) कालावधीत सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रम परिसरात औदुंबराची अनेक रोपे आपोआप उगवली आहेत. यांपैकी ध्यानमंदिराच्या बाहेरच्या चौकात १६, तर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रहात्या खोलीच्या पूर्व आणि उत्तर या दिशांना ३१, अशी औदुंबराची एकूण ४७ नवीन रोपे उगवली आहेत. यामागील अध्यात्मशास्त्र पुढीलप्रमाणे आहे.
१. वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर ही झाडे २४ घंटे वातावरणात प्राणवायू सोडत असल्याने त्यांना ‘देववृक्ष’ असे संबोधले जाणे
‘वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर ही झाडे वातावरणात २४ घंटे प्राणवायू सोडतात. प्राणवायूची प्राणीमात्रांना जगण्यासाठी आवश्यकता असते. इतर झाडे वातावरणात कार्बन डाय-ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी प्रदूषणकारी वायूही बाहेर टाकतात. त्यामुळे ‘वड, पिंपळ, चाफा, तुळस, बेल, शमी, चिंच, पारिजातक आणि औदुंबर यांना प्राचीन काळापासून ‘देववृक्ष’ असे संबोधण्यात येते. बाकीच्या सगळ्या झाडांना वृक्ष किंवा वनस्पती म्हणतात’, से वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे.’ (संदर्भ : विश्वचैतन्याचे विज्ञान)
१ अ. ‘कोरोना महामारी’च्या वाढत्या संसर्गामुळे वातावरण दूषित होत असल्याने ‘साधकांचे रक्षण व्हावे’, यासाठी सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची नवीन रोपे आपोआप उगवल्याचे जाणवणे : सध्याच्या ‘कोरोना महामारी’च्या वाढत्या संसर्गामुळे वातावरण दूषित होत चालले आहे. त्यामुळे विश्वस्तरावर मोठ्या प्रमाणावर समस्या उद्भवली आहे. अनेक लोक प्राणवायू वेळीच उपलब्ध न झाल्यामुळे जीवनाला मुकत आहेत. या स्थितीपासून साधकांचे रक्षण व्हावे आणि साधकांना आपोआप नैसर्गिकरित्या प्राणवायू मिळावा, यासाठी सनातनच्या आश्रम परिसरात औदुंबराची एकूण ४७ नवीन रोपे आपोआप उगवली असल्याचे जाणवले.
२. साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवर लाभ होण्यासाठी आश्रमात पुष्कळ प्रमाणात औदुंबराची रोपे उगवल्याचे जाणवणे
‘बोविसने वनस्पतींकडून प्रक्षेपित होणार्या किरणोत्सर्गाच्या तरंगांचा अभ्यास केला. त्यावरून पुढे सायमनटनने निरनिराळ्या स्थितीतल्या खाद्यपदार्थांकडून प्रक्षेपित होणार्या तरंगांचे मोजमापन केले. या संशोधनावरून त्याने निष्कर्ष काढला, ‘वनस्पतीजन्य अन्न माणसाची ऊर्जा वाढवू शकते आणि त्याद्वारे शरीर अन् मन या दोन्हींचे आरोग्य सुधारू शकते.’ (संदर्भ : मनःशक्ती जून २०००)
आश्रमातील साधकांना येणार्या थकवा, अंगदुखी यांसारख्या त्रासांवर शारीरिक, तसेच मानसिक अन् आध्यात्मिक स्तरांवर लाभ होण्यासाठी अनुमाने १ मासामध्ये यज्ञकुंडाच्या परिसरात औदुंबराची रोपे आपोआप उगवल्याचे जाणवले.
३. कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्म परीक्षणाच्या माध्यमातून मिळालेले ज्ञान
३ अ. औदुंबराची रोपे उगवण्यामागील आध्यात्मिक कार्यकारणभाव : ‘भूमीमध्ये चैतन्य कार्यरत असल्यामुळे सात्त्विक भूमीमध्ये औदुंबराची रोपे उगवतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय अस्तित्वामुळे सनातनच्या आश्रमातून वातावरणात चैतन्य पसरते. विश्वभरातील साधकांना साधना आणि धर्माचरण यांविषयी मार्गदर्शन करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये दत्ततत्त्व कार्यरत होऊन ते संपूर्ण विश्वात पसरते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून प्रक्षेपित झालेले दत्ततत्त्व सनातन संस्थेच्या रामनाथी आश्रमातील भूमीमध्ये आकृष्ट झाल्यामुळे या भूमीमध्ये औदुंबराची नवीन रोपे उगवली आहेत. परात्पर गुरुदेवांकडून प्रक्षेपित होणारे दत्ततत्त्व निर्गुण-सगुण स्तरावरील असल्यामुळे साधकांना ते तत्त्व ग्रहण करण्यास कठीण जाते. याउलट आश्रमाच्या परिसरात उगवलेल्या औदुंबराच्या रोपांकडून वातावरणात सगुण-निर्गुण स्तरावरील दत्ततत्त्व प्रक्षेपित झाल्याने साधकांना ते त्वरित ग्रहण करता येते. आश्रमाच्या परिसरात विविध ठिकाणी औदुंबराची रोपे उगवल्यामुळे या रोपांतून वातावरणात चैतन्य प्रक्षेपित होते. त्यामुळे आश्रमाच्या भोवती तेज आणि वायु या तत्त्वांच्या स्तरांवरील चैतन्यदायी वायुमंडल निर्माण होते आणि सूक्ष्मातील वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून आश्रमाचे रक्षण होते.
३ आ. औदुंबराच्या रोपांचा साधकांवर आध्यात्मिक स्तरावर परिणाम होणे आणि तो आश्रमापासून ५ कि.मी. अंतराच्या परिघापर्यंत होत असल्याचे जाणवणे : औदुंबराच्या रोपांमध्ये निर्गुण-सगुण स्तरावरील दत्ततत्त्व कार्यरत असते. त्यामुळे सनातनचे साधक आणि सनातनचा आश्रम यांच्यावर सूक्ष्मातील मोठ्या वाईट शक्तींनी केलेल्या आक्रमणांमुळे दूषित झालेल्या तेथील वायुमंडलातील त्रासदायक लहरी औदुंबर वृक्षांतील सात्त्विकता अन् चैतन्य यांच्या लहरींद्वारे नष्ट होतात. औदुंबर वृक्षातून प्रक्षेपित झालेल्या दत्ततत्त्वमय प्राणशक्तीमुळे साधकांच्या प्राणशक्तीवहन संस्थेतील ४० टक्के अडथळे दूर होऊन त्यांच्या श्वासोच्छ्वासातील अडथळे दूर होतात. हा परिणाम आश्रमापासून ५ कि.मी. अंतराच्या परिघापर्यंत होत असल्याचे जाणवले.
३ इ. आश्रमाच्या परिसरात औदुंबराची रोपे उगवल्यामुळे साधकांचे कोरोनाच्या संकटापासून रक्षण होत असणे : कोरोनोच्या विषाणूंमध्ये कार्यरत असणार्या वाईट शक्तींची शक्ती नष्ट करण्यासाठी ‘श्री दुर्गा, दत्त आणि शिव’ या नामजपात तीन देवतांची तत्त्वे कार्यरत झाली आहेत. या तीन तत्त्वांमुळे कोरोनाच्या माध्यमातून कार्यरत असणार्या विषाणूंमधील त्रासदायक शक्ती नष्ट होते. औदुंबर वृक्षामध्ये दत्ततत्त्व कार्यरत असल्यामुळे सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या परिसरात औंदुबर वृक्षातून प्रक्षेपित झालेल्या दत्तात्रेयांच्या मारक शक्तीमुळे कोरोना विषाणूंतील त्रासदायक शक्ती नष्ट होत आहे. त्याचप्रमाणे साधकांच्या भोवती दत्ततत्त्वमय चैतन्याच्या लहरी कार्यरत झाल्यामुळे अतृप्त पितर आणि इतर वाईट शक्ती यांच्यासह कोरोनाच्या विषाणूंपासून साधकांचे रक्षण होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या महामारीचा संसर्ग होण्यापासून अनेक साधकांचे रक्षण होत आहे.
४. औदुंबराची मुळे, खोड, फांद्या आणि पाने यांच्याकडून होणारे आध्यात्मिक स्तरांवरील कार्य
कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०२१)
‘ऋषिमुनी तपश्चर्या किंवा अनुष्ठान करत असतांना ‘सुकलेल्या काठीला पालवी (अंकुर) फुटणे’ आदी बुद्धीअगम्य घटना घडल्याचे अनेक पुराणांमध्ये वाचायला मिळते. अध्यात्म हे शास्त्र आहे. त्यामुळे अध्यात्मशास्त्रातील ‘भाव तेथे देव’, ‘पंचमहाभूतांद्वारे सजीव-निर्जिवांची उत्पत्ती होते’ आदी सिद्धांतांनुसार पुराणकाळात आलेल्या अनुभूती सध्याच्या कलियुगातही येतात; पण त्यासाठी ईश्वरप्राप्तीच्या उद्देशाने भक्तीभावाने साधना करावी लागते.
कृतज्ञता
श्रीदत्तगुरूंच्या कृपेमुळे सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या परिसरात औदुंबराची अनेक रोपे उगवल्यामुळे तो आश्रम आणि तेथील साधक यांच्याभोवती चैतन्यमय संरक्षककवच निर्माण झाले आहे. यासाठी श्रीदत्तगुरूंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय. (२.५.२०२१)
वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणारे वनस्पतीशास्त्रातील तज्ञ आणि अभ्यासू, तसेच या विषयाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना विनंती !१. ‘कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये औदुंबराची रोपे उगवण्यामागील वैज्ञानिक कारण काय ? २. अधिक संख्येने औदुंबराचीच रोपे उगवण्याचे कारण काय ? या ठिकाणी इतर रोपे का आली नाहीत ? ३. औदुंबराच्या या रोपांचे कोणत्या वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन करावे ? या संदर्भात वैज्ञानिक दृष्टीने संशोधन करणार्यांचे साहाय्य लाभल्यास आम्ही कृतज्ञ असू.’ – व्यवस्थापक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. |
सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |