काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड करणार्‍या ६ युवकांची जामीनावर मुक्तता !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा – सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर मराठा समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याचे पडसाद सातारा येथे उमटले होते. काही युवकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी भवनाची तोडफोड केली होती. या युवकांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हा न्यायालयापुढे उपस्थित केले असता त्यांना १५ सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्यात आले आहे.

निखिल यादव, उदयराज माने, शुभम् मोहिते, यशराज शिंगटे, प्रसाद भोसले, सुरज येवले यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात ४१६, ४२० आणि ४२१ कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले होते.