परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अवतारी गुरूंची आणि त्यांच्या अवतारी कार्याची महती माझ्यासारख्या जिवाला काय ज्ञात होणार ? तरीही गेली २३ वर्षे मला स्थुलातून त्यांच्या जवळ रहाण्याचे भाग्य त्यांच्याच कृपेने लाभले आणि त्यांच्या माध्यमातून स्थापन होणार्या सनातन धर्मराज्याची (हिंदु राष्ट्राची) जडण-घडण होतांना मला ‘याची देही याची डोळा’ प्रत्यक्ष पहाता आली. जे माझ्या लक्षात आले, ते मी त्यांच्याच कृपेने लिहीत आहे. १० मे या दिवशी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आश्रम जीवनातून साधकांना दिलेली शिकवण’ या लेखातील काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! : https://sanatanprabhat.org/marathi/475535.html
२३. रामनाथी आश्रम
२३ आ. स्वयंपाकघरातील व्यवस्था
६. स्वयंपाक बनवण्याच्या (अल्पाहाराच्या) सेवेत आश्रमातील सर्व साधक आश्रमस्तरावर केलेल्या आठवड्याच्यानियोजनानुसार सहभाग घेतात.
७. स्वयंपाकघराची स्वच्छता प्रत्येक प्रसाद-महाप्रसाद बनवल्यानंतर (म्हणजे दिवसातून ४ वेळा) केली जाते.
२३ इ. गृह-व्यवस्थापन
१. ‘बाहेरगावाहून आलेल्यांसाठी अंथरूण-पांघरूण आहे कि नाही ?’, हे पाहून त्याची व्यवस्था केली जाते.
२. प्रतिष्ठित व्यक्ती, संत यांच्यासाठी आश्रमात वापरण्यासाठी पायात घालायच्या ‘स्लीपर’पासून दैनंदिन जीवनात लागणारेतेल, कंगवा, साबण, कपडे टांगण्यासाठीच्या टांगण्या (हँगर्स) अशा सर्वच वस्तूंची सोय केली जाते.
३. अंथरूण-पांघरूण नियमितपणे धुण्याचे नियोजनही केलेले असते.
२३ ई. आश्रमाची स्वच्छता
१. संपूर्ण आश्रमाची स्वच्छता साधक स्वतः करतात.
२. प्रत्येक खोलीत रहाणार्या साधकांचे केर काढणे, फरशी पुसणे, केराची बालदी धुणे, खिडक्या आणि दारे पुसणे अशाप्रत्येक दिवशीच्या सेवांचे नियोजन केलेले असते आणि त्याप्रमाणे स्वच्छता केली जाते.
३. जिना (दादरा), मार्गिका, शौचालये आणि स्नानगृहे अशा सामायिक जागांच्या स्वच्छतेचेही प्रत्येक दिवशीचे नियोजनकेलेले असते. त्यानुसार साधक ही स्वच्छता करतात.
४. दैनंदिन स्वच्छते समवेतच प्रत्येक खोली आणि प्रत्येक सेवेचे ठिकाण यांची प्रत्येक मासातून एकदा संपूर्ण स्वच्छता केली जाते, तर प्रत्येक ३ मासांतून एकदा आश्रम परिसराची स्वच्छता केली जाते.
खोलीतील स्वच्छतेचे नियोजन खोलीत, तर सामायिक जागा, सेवेचे ठिकाण आणि परिसर यांच्या स्वच्छतेचे नियोजन प्रत्येक आठवड्याला आश्रमस्तरावर केले जाते. हे नियोजन फलकावर लावले जाते. ते पाहून साधक त्याला दिलेली स्वच्छतेची सेवा त्या-त्या वेळेत पूर्ण करून सारणीत सेवा पूर्ण केल्याची खूण करतात. अशा प्रकारे नियमित स्वच्छतेमुळे आश्रमातील चैतन्य टिकून रहाते.
२३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी फुले काढण्याची पद्धत शिकवणे : आश्रमात देवपूजेसाठी फुले लागतात. ‘ही फुले झाडावरून कशी काढायची ?’, याची पद्धतही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवली. ‘आश्रमाच्या परिसरात असलेल्या फुलझाडांवरील फुले काढतांना आश्रमाच्या दर्शनी भागातील आणि झाडाच्या दर्शनी भागातील फुले न काढता मधल्याभागातील फुले काढावीत. फुले काढण्या आधी प्रार्थना करून आणि देवाला विचारून फुले काढावीत आणि ही फुले काढल्यानंतर ती देवपूजेसाठी देतांना परडीत फुलांची रचनाही सुंदर करावी’, हेही त्यांनीच शिकवले.
२३ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अल्पसंतुष्टतेला वाव न देता साधकांना मोक्ष प्राप्तीपर्यंत अखंड प्रयत्नरत ठेवणे : आतापर्यंत सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारे १३४० साधक जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून पार झाले आहेत, तर ११० साधकांनी संतपद प्राप्त केले आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक साधकाला त्याच्या साधनेत कुठेही अल्पसंतुष्ट होऊ दिले जातनाही. ‘कितीही मोठ्या अनुभूती आल्या, पातळी कितीही वाढली, तरी मोक्षाला जाईपर्यंत अखंड प्रयत्नरतच रहायचे आहे’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सतत शिकवण आहे.
२३ ए. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सनातन संस्थेतील साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीवर बारीक लक्ष ठेवणे : परात्पर गुरुडॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक स्तराचे नेमके मोजमापन करून ते त्यांना वेळोवेळी सांगितले आहे. यामुळे साधकांना आपली साधना नेमकी कशी चालू आहे, याचा स्पष्ट अंदाज येतो. यामुळे साधकांना आपली साधना नेमकी कशी चालू आहे, याचा स्पष्ट अंदाज येतो. वर्ष २००८ पासून त्यांनी आध्यात्मिक पातळी काढण्यास आरंभ केला आणि त्यानंतर प्रत्येक गुरुपौर्णिमेलाही हे घोषित करणे चालू केले.
२३ ऐ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वतःच्या देहात अडकू न देणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना त्यांच्या देहात कधीही अडकू दिलेले नाही. पहिल्यापासूनच त्यांनी साधकांना त्यांचे दर्शन घेणे, त्यांच्या पाया पडणे अशा स्थूलकृती करण्यापासून रोखले आहे. त्यांनी नेहमी मानस नमस्काराचाच पुरस्कार केला आहे. कित्येक साधकांनी त्यांना पाहिलेले नाही, तरीही ते त्यांनी सांगितलेली गुरुकृपा योगानुसार साधना करत आध्यात्मिक उन्नती करत आहेत, तसेच राष्ट्र आणि धर्मकार्यात अग्रेसर आहेत. त्यानंतर (साधारणतः वर्ष २००९ मध्ये) त्यांनी साधकांना श्रीकृष्णाकडे वळवले. ‘मला प्रार्थना करण्याऐवजी श्रीकृष्णाला प्रार्थना आणि आत्मनिवेदन करा, त्याच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा’, असे ते सांगायचे. या योगेही त्यांनी साधकांना त्यांच्या देहात अडकण्यापासून रोखले.
२३ ओ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वयंपूर्ण बनवणे : खरेतर परात्पर गुरु डॉ. आठवले हे अध्यात्मात येण्याआधी एक डॉक्टर होते; परंतु त्यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच आणि नंतर आश्रम स्थापन झाल्यावरही एकेका सेवेच्या ठिकाणी घडी इतरत्र असते त्या धर्तीवर न बसवता ‘आध्यात्मिकदृष्ट्या अथवा ईश्वरी राज्याच्या संकल्पनेनुसार कशी असायला हवी ?’, या दृष्टीने स्वतः बसवली. यात सनातनच्या ग्रंथांची निर्मिती, छपाई, नियतकालिके यांपासून ते बांधकाम, स्थापत्य, संकेतस्थळ, स्वयंपाकघर आणि शिवणकला यांपर्यंत ‘प्रत्येक सेवेचे क्षेत्र म्हणजे ‘ईश्वरी राज्याचे एक आदर्श अंग ’या दृष्टीने परिपूर्ण, सात्त्विक आणि चैतन्यमय कसे असायला हवे ?’, हे प्रत्यक्ष स्वतः लक्ष घालून घडवले. हे करत असतांना त्यामागील शास्त्र प्रत्येक वेळी स्पष्ट करून साधकांना त्यांनी स्वयंपूर्ण केले. अशा रितीने आज प्रत्येक ठिकाणी त्या-त्याविषयात त्यांनी सिद्ध (तयार) केले आहेत, असे साधक आहेत.
२३ औ.‘स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसारसाधना’ या साधनामार्गातील अविभाज्य घटक असणे : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गातील ८ अंगांपैकी पहिली दोन अंगे अनुक्रमे ‘स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन’ ही आहेत. यादृष्टीने संस्थेमधील प्रत्येक साधकाने प्रत्येक दिवशी प्रयत्न करणे अपेक्षित असते. या अंतर्गत ‘साधकांनी स्वतःचे सखोल निरीक्षण करून स्वतःकडून विविध स्तरांवर होणार्या चुकांची नोंद ठेवणे, त्या चुका होण्यास कारणीभूत असलेली मनाची अयोग्य विचारप्रक्रिया शोधणे आणि त्यामागील दोष आणि अहं यांचे पैलू यांचा सखोल अभ्यास कसा करायचा ?’ हे शिकवले जाते. यासाठी सहसाधकांचे साहाय्य घेऊन स्वतःला लक्षात न आलेल्या चुका, दोष आणि अहंचे पैलू जाणून घ्यायचे असतात. या प्रयत्नांचा नियमित आढावाही घेतला जातो आणि त्या वेळी पुढील मार्गदर्शन करण्यात येते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवल्यास त्यातून स्वतःमध्ये होणारे पालट ओळखणे, त्यासंदर्भात इतरांना विचारून घेणे, हेही शिकवले जाते. जे समष्टीमध्ये दायित्व घेऊन सेवा करतात, तसेच ज्यांच्यामध्ये दोष आणि अहं यांचे प्राबल्य अधिक आहे, त्यांना स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया करण्यास सांगण्यात येते. या प्रक्रियेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी विशेषत्वाने दायित्व असलेल्या साधकांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रित प्रयत्न करण्याची संधी असते. विशेष म्हणजे हे प्रयत्न मानसिक स्तरावर करण्याऐवजी भावाच्या स्तरावर आणि देवाच्या साहाय्याने केले जातात. अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सर्वत्र कार्याची घडी बसवण्यास मवेतच साधकांच्या व्यष्टी साधनेची घडी बसवण्याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे.
‘सनातन प्रणित वैशिष्ट्यपूर्ण स्वभावदोष-निर्मूलन आणि अहं-निर्मूलन प्रक्रिया’ याचा लाभ देश-विदेशातील सनातन संस्थेमध्ये नसलेले अनेक जिज्ञासूही घेत आहेत. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने ५ दिवसीय अभ्यासवर्गांचे आयोजन करण्यात येते.
(क्रमश : वाचा उद्याच्या अंकात)
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.४.२०१७)