सोलापूर – रमझान ईदच्या काळात कडक संचारबंदी लागू करणे अयोग्य आहे. आम्ही घरातच राहून ईद साजरी करू; परंतु ईदला लागणारे आवश्यक सामान आणायचे कुठून ? त्यामुळे ८ ते १५ मे या कालावधीत संचारबंदी शिथिल करा, अशी मागणी शहर काझी अमजद अली यांनी पालकमंत्र्यांना भेटून केली. या संदर्भात माजी आमदार नरसय्या आडम आणि आम आदमी पक्षानेही पालकमंत्र्यांना निवेदन दिले आहे. (केंद्रशासनाने सोलापूर जिल्ह्याचा सर्वाधिक कोरोनाबाधित जिल्ह्यात नुकताच समावेश केला आहे. असे असतांना संचारबंदी शिथिल करण्याची मागणी करणारा पक्ष कधीतरी जनहित साधू शकेल का ? – संपादक) पालकमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय न घेतल्यास समाजातील मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा आणि धोरण ठरवू, अशी माहिती शहर काझी यांनी नियोजन भवनासमोर पत्रकारांशी बोलतांना दिली. (कोरोनाचा कहर वाढलेला असतांना हिंदूंनी त्यांचे सण निर्बंधांसह साजरे केले, याउलट गेल्या वर्षी रमझान ईदच्या काळात कोरोनाचे नियम मोडले गेले. सध्या कोरोनाची दुसरी लाट आवाक्याबाहेर असून सोलापूर जिल्हा अधिक संवेदनशील होत चालला आहे. अशा स्थितीत समाजभान नसणारे धार्मिक नेते जनतेला काय दिशा देणार ? मान्यवरांची बैठक घेऊन पुढील रूपरेषा आणि धोरण ठरवू म्हणजे ही गर्भित धमकी तर नाही ना, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ? – संपादक)