लसीकरण प्रमाणपत्रावर ‘जय महाराष्ट्र’ असे छापण्याची नगर येथून मागणी

नगर, ६ मे – केंद्र सरकारच्या खर्चातून लसीकरण केल्यावर प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र येते. जर ही लस राज्य सरकारच्या खर्चातून दिली, तर त्यावर महाराष्ट्राचा नकाशा आणि ‘जय महाराष्ट्र’ असे छापावे, अशी मागणी सामजिक माध्यमाद्वारे नगरच्या तरुणांनी केली आहे.

यासंबंधी बोलतांना स्मायलिंग अस्मिता शेतकरी कष्टकरी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यशवंत तोडमल म्हणाले की, ही लस राज्याच्या खर्चातून म्हणजे राज्यातील जनतेच्या पैशांतून दिली जाणार आहे. त्यामुळे त्यावर राज्याचा उल्लेख असणे आवश्यक वाटते. व्यक्तीपेक्षा राज्य आणि राज्यातील जनता श्रेष्ठ आहे. त्यामुळे राज्याचा नकाशा असावा, असे आमचे मत आहे.