जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांसाठी १७ कोटी ९४ लाखांचा निधी संमत ! – राजेंद्र पाटील, यड्रावरकर, आरोग्य राज्यमंत्री

राजेंद्र पाटील, यड्रावरकर,

कोल्हापूर – आरोग्य अभियान योजनेच्या अंतर्गत जिल्ह्यातील ३६३ आरोग्य केंद्रातील जवळपास १७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत आरोग्य सेवेकडे उपलब्ध असलेल्या आरोग्य उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रूपांतर करण्यासाठी या उपकेंद्रांची डागडुजी करणे, उपकेंद्रे रंगरंगोटीसह मजबूत करणे यासाठी हा निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिली.

आरोग्य राज्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोना संसर्गाच्या मागील दीड वर्षांच्या कार्यकाळात आरोग्य विभागातील सर्व घटकांनी दायित्वाने काम केले आहे. या उपकेंद्रांच्या वतीने नागरिकांना आरोग्य सुविधा देण्यासमवेत आरोग्यविषयक सर्वेक्षणाचे कामही उत्तरदायीपणे पार पाडले गेले. एकूणच आरोग्य उपकेंद्रे यांची अत्यावश्यकता कोरोना महामारीच्या काळात प्रभावीपणे जाणवली आहे. त्यामुळे यापुढील काळात ही सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे आणखीन मजबूत करणे आवश्यक आहे.