भुईबावडा घाटात पोलीस तपासणी नाका चालू करण्याची मागणी

वैभववाडी – कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना जोडणार्‍या तालुक्यातील भुईबावडा घाट मार्गात पोलीस तपासणी नाका चालू करण्याची मागणी भाजपचे भालचंद्र साठे यांनी केली आहे. भुईबावडा घाट मार्गे जिल्ह्यात विनाअनुमती राजरोस वाहतूक चालू आहे. अशीच वाहतूक चालू राहिल्यास जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ शकते. या पार्श्‍वभूमीवर सावधानता म्हणून भुईबावडा घाट मार्गात तात्पुरत्या स्वरूपात पोलीस तपासणी नाका चालू करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हा चिटणीस भालचंद्र साठे यांनी प्रसिद्धीपत्रकातून केली आहे. विजय मिळवण्याचा निर्धार व्यापार्‍यांनी केला आहे.