ऑगस्ट २०२० मध्ये ‘कॅराव्हॅन’मधून करण्यात आलेल्या एस्.एस्.आर्.एफ्.च्या प्रसारकार्याच्या वेळी सद्गुरु सिरियाक वाले यांनी जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथील जिज्ञासूंना दिलेल्या भेटींतील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अध्यात्मप्रसाराचा एक भाग म्हणून सद्गुरु सिरियाक वाले विविध देशांतील जिज्ञासू, तसेच साधक यांना भेटण्यासाठी ‘कॅराव्हॅन’मधून प्रवास करत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये जर्मनी आणि स्वित्झर्लंड येथील जिज्ञासू आणि साधक यांची त्यांनी भेट घेतली. त्या वेळी जिज्ञासूंविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु सिरियाक वाले

१. स्वित्झर्लंड

सद्गुरु सिरियाक वाले यांनी झ्युरिच येथे मिरियाना क्रूमेझ, मिशेल क्रूमेझ, बिक्वॅन झँग आणि तेरेसा गुट्सा यांची, तसेच बासेल येथे मार्शेल ब्राऊन, डॉमिनिक इसेनोर, युक्ती भार्गव आणि त्यांचे यजमान यांची भेट घेतली.

१ अ. ११.८.२०२०

१ अ १. बासेल

अ. या दिवशी ‘लाईव्ह स्ट्रीम’वर सामूहिक नामजपाचे सत्र चालू असतांना युक्ती भार्गव आणि डॉमिनिक इसेनोर यांना वातावरणातील असामान्य स्थिती अन् उष्णता असतांनाही सकारात्मक (चांगले) वाटत होते.

आ. युक्ती यांना आतून इतके शांत वाटत होते की, त्यांना काहीच बोलावेसे वाटत नव्हते, तसेच त्यांना ‘तेथून जाऊच नये’, असे वाटत होते. ‘मी भारतात आहे’, असे युक्ती यांना वाटत होते.

इ. डॉमिनिक यांनी कळवले, ‘कॅराव्हॅन’मध्ये झालेल्या सत्संगानंतर गेले अनेक दिवस कोणत्याही कारणाविना मला पुष्कळ आनंद जाणवत आहे.’

अन्य दिवसांच्या तुलनेत आम्हालाही एक वेगळीच शक्ती जाणवत होती, म्हणजे आम्हाला अधिक सकारात्मकता आणि आनंद जाणवत होता.

२. जर्मनी

२ अ. १२.८.२०२०

२ अ १. फ्रीबर्ग – एका महिलेने ‘कॅराव्हॅन’च्या जवळून जात असतांना अभिवादन करणे, एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाविषयी माहिती सांगितल्यावर तिला भारताविषयी ओढ वाटू लागणे आणि ‘मागील जन्मी आपण भारतात होतो’, असे तिला वाटणे : फ्रीबर्ग येथे १२.८.२०२० या दिवशी सद्गुरु सिरियाक वाले यांनी इमिना कॅरालिक, फिलिप एग्ली, कार्ला बोम आणि लुसेरो नायथमेर या साधकांची भेट घेतली. एक महिला ‘कॅराव्हॅन’च्या जवळून २ – ३ वेळा चालत गेली. प्रत्येक वेळी आम्हा साधकांना ती अभिवादन करत होती. दुसर्‍या दिवशी ती महिला आमच्याशी बोलायला आली. आम्ही तिला एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळाविषयी माहिती सांगितली. तिला भारताविषयी ओढ आणि जवळीक वाटू लागली, तसेच ‘मागील जन्मी मी भारतात होते’, असे तिला वाटले.

२ आ. १८ ते २३ ऑगस्ट २०२० : सद्गुरु सिरियाक वाले यांनी या कालावधीत कार्ल्सरूहे येथे श्री. सेबॅस्टियन काम्स्, श्री. कार्ल बार्व्हित्सकी आणि केर्स्टिन माटेन यांची; स्टुटगार्ट येथे पॅट्रिक; वॉलडर्न येथे रेनाटा स्टाइन आणि अँड्रिया स्टाइन यांची; श्‍वाइनफोर्ट येथे सेबास्टियन आणि क्रिस्टिना यांची भेट घेतली.

२ आ १. स्टुटगार्ट – अर्धांगवायूचा झटका आलेल्या श्री. पॅट्रिक न्यूकाम यांचे ‘कॅराव्हॅन’मध्ये बसून नामजप ऐकतांना ध्यान लागणे, नामजप ऐकल्यानंतर त्यांना त्यांचा लुळेपणा अल्प झाल्याचे जाणवणे आणि नामजपादी उपायांच्या सत्रात पुष्कळ शक्ती जाणवणे : श्री. पॅट्रिक हे ३३ वर्षांचे असून वयाच्या ३१ व्या वर्षी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. आम्ही त्यांना ‘कॅराव्हॅन’मध्ये बसून श्रीकृष्णाचा नामजप ऐकण्यास सांगितले, तसेच नामजपादी उपायांसाठी रिकामी खोकी वापरण्यास सांगितले. जवळजवळ २ घंटे ते हालचाल न करता स्थिर होते, तसेच या कालावधीत त्यांचे ध्यान लागले. त्यांना या अनुभूतीविषयी आश्‍चर्य वाटले. नामजप ऐकल्यानंतर त्यांना त्यांचा लुळेपणा अल्प झाल्याचे जाणवले, तसेच नामजपादी उपायांच्या सत्रात त्यांना पुष्कळ शक्ती जाणवली.

२ आ २. श्‍वाइनफोर्ट

२ आ २ अ. सेबास्टियन आणि क्रिस्टिना यांच्या घरी गेल्यावर त्यांनी फुले देऊन स्वागत करणे आणि त्यांना नामजपादी उपायांविषयी सांगत असतांना त्यांचा आध्यात्मिक त्रास वाढणे : सेबास्टियन आणि क्रिस्टिना यांनी या प्रवासाविषयी वाचले. तेव्हा त्यांनी आम्हाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेव्हा त्यांनी फुले देऊन आमचे स्वागत केले. आम्हाला त्या दोघांमध्येही भाव जाणवला. त्यांना नामजपादी उपायांविषयी सांगत असतांना त्यांचा आध्यात्मिक त्रास वाढला. त्या वेळी त्यांनी आमचे स्वागत करण्यासाठी जी फुले दिली होती, ती दुसर्‍या एका खोलीत एका फुलदाणीत ठेवली होती. ती फुलदाणी कुणीतरी जोरात धक्का दिल्याप्रमाणे खाली भूमीवर पडली.

२ आ २ आ. ‘कॅराव्हॅन’मध्ये प्रवेश केल्यावर क्रिस्टिनाचा आध्यात्मिक त्रास वाढणे आणि नंतर तिची भावजागृती होऊन तिला स्वर्गात असल्याप्रमाणे जाणवणे : सेबास्टियन हे ‘ऑनलाईन’ कार्यशाळेसाठी ‘कॅराव्हॅन’मध्ये आले. क्रिस्टिनाला ‘कॅराव्हॅन’ पहायची होेती. तिने ज्या क्षणी ‘कॅराव्हॅन’मध्ये प्रवेश केला, त्या क्षणी तिच्या आध्यात्मिक त्रासात वाढ झाली. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ‘कॅराव्हॅन’मध्ये सूक्ष्मातून अस्तित्व आहे आणि तेच या ‘कॅराव्हॅन’चे रक्षण करत आहेत’, याची ही एक प्रकारची साक्षच होती. नंतर क्रिस्टिना ‘कॅराव्हॅन’मध्ये बसली. त्या वेळी तिची भावजागृती होऊन तिला स्वर्गात असल्याप्रमाणे जाणवत होते.

२ आ २ इ. साधनेविषयी प्रायोगिक स्तरावर मार्गदर्शन मिळाल्याने सेबास्टियन आणि क्रिस्टिना यांना परात्पर गुरु डॉ. आठवले अन् एस्.एस्.आर्.एफ्. यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे : सेबास्टियन आणि क्रिस्टिना यांनी अनेक साधनामार्गांनुसार साधना केली; परंतु ‘आध्यात्मिक त्रास कसे दूर करायचे ? साधना कशी करायची ?’, याविषयी प्रायोगिक स्तरावर कोणतेच मार्गदर्शन त्यांना मिळाले नाही. त्यामुळे एस्.एस्.आर्.एफ्.च्या माध्यमातून ते मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एस्.एस्.आर्.एफ्. यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

संकलक : (सद्गुरु) श्री. सिरियाक वाले, युरोप (सप्टेंबर २०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक