वाकड येथील ‘इंदिरा नॅशनल स्कूल’ची मान्यता रहित करण्यासाठी शिक्षण उपसंचालकांना पत्र !

पिंपरी – वाकड येथील ‘इंदिरा नॅशनल स्कूल’च्या व्यवस्थापनाने १७४ विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क भरले नसल्याचे कारण देत पटावरून कमी करून दाखले दिले आहेत. ‘शिक्षण हक्क अधिनियम २००९’च्या कलम १६ चा शाळेने भंग करून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणले आहे. त्यामुळे या शाळेची मान्यता रहित करून व्यवस्थापनावर कायदेशीर कारवाई करावी आणि सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा प्रवेश मिळवून द्यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक यांना प्रत्यक्ष पत्र देऊन केली आहे.

न्यायालय आणि राज्य सरकार यांनी शालेय व्यवस्थापनांना शिक्षण शुल्क आकारणीच्या संदर्भात स्वतंत्र आदेश दिले असतांनाही ‘इंदिरा नॅशनल स्कूल’च्या व्यवस्थापनाने मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आणले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.