सांगली – अनिकेत कोथळे खून खटल्यातील संशयित बडतर्फ पोलीस हवालदार अरुण टोणे यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ४ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला कारागृह प्रशासनाने येथील शासकीय रुग्णालयात नेले; परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.