परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी नोएडा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. जन्मोत्सवाच्या वेळी आलेल्या अनुभूती 

१ अ. चंदनाचा सुगंध येणे : ‘कार्यक्रमापूर्वी मला पुष्कळ झोप येत होती आणि झोपण्याची तीव्र इच्छा होत होती. मी उठून एक पेला पाणी प्यायले. तेव्हा ‘त्या पेल्यातून पुष्कळ प्रमाणात चंदनाचा सुगंध येत आहे’, असे मला जाणवले. त्या पेल्यातून मी दोनदा पाणी प्यायल्यानंतर माझी झोप पूर्ण गेली आणि मी तो कार्यक्रम निर्विघ्नपणे पाहू शकले.’ – अक्षिता वार्ष्णेय, नोएडा

१ आ. परात्पर गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवातील कार्यक्रमात आम्हाला परात्पर गुरुदेवांचे दर्शन झाले, हे आमचे सौभाग्य आहे. ते पाहून ‘मलाही परात्पर गुरुदेवांची सेवा करण्याची संधी मिळावी’, असे वाटले. मी कार्यक्रम पहात होते. तेव्हा मला ‘परात्पर गुरुदेवांनी माझ्या घरात प्रवेश केला आहे आणि त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद दिला’, असे जाणवले. ‘परात्पर गुरुदेव आपली कृपा आमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहू द्या’, हीच प्रार्थना आहे.’ – सौ. गीता बिष्ट, नोएडा

२. जन्मोत्सवाच्या वेळी झालेले त्रास

अ. ‘सकाळपासूनच माझ्या पाठीत वेदना होत होत्या. कार्यक्रमाच्या वेळी पुष्कळ झोप येऊन कशाचेच आकलन होत नव्हतेे.’ – श्रीमती कुमकुम भरद्वाज, नोएडा

आ. ‘भावसोहळा पहातांना पुष्कळ झोप येत होती आणि माझ्या पायांमध्ये पुष्कळ कळा येत होत्या. नामजप केल्यानंतर झोप येण्याचे आणि पायात कळा येण्याचे प्रमाण अल्प झाले.’ – श्रीमती क्षमा गुप्ता, नोएडा

इ. ‘जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी घरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. माझ्या मनाची स्थिती बिघडली आणि मला काही करण्याची इच्छाच होत नव्हती. मी विभूतीचे उपाय आणि प्रार्थना केल्यावर माझ्या मनाची स्थिती चांगली झाली. कार्यक्रमाच्या वेळी पायांमध्ये पुष्कळ कळा येऊन झोप येत होती.’ – श्रीमती मोहिनी कुलकर्णी, नोएडा

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक