तत्कालीन सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांना सशर्त जामीन

महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याचे प्रकरण

डॉ. श्रीमंत चव्हाण

सिंधुदुर्ग – एका महिला कर्मचार्‍याचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेले तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची १२ एप्रिलला येथील जिल्हा न्यायालयाने १५ सहस्र रुपयांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली. जिल्हा रुग्णालयात काम करणार्‍या एका कंत्राटी महिला कर्मचार्‍याने डॉ. चव्हाण यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दिली होती. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. ८ एप्रिलला जिल्हा न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी बजावली होती.