काश्मीरमधील स्थिती सामान्य, तर चीनमध्ये उघूर मुसलमानांवर अत्याचार चालूच !

अँटनी ब्लिंकेन

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकाराविषयी सादर केलेल्या अहवालामध्ये जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य होत असल्याचे म्हटले आहे. चीनमध्ये मात्र उघूर मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, असे या अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

१. या अहवालात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये परत सामान्य स्थिती आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने पावले उचलत आले आहे. सरकारने दूरसंचार माध्यमांवर लावण्यात आलेला निर्बंध हटवले आहेत. तसेच नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या नेत्यांनाही मुक्त केले आहे.

२. दुसरीकडे या अहवालात चीनविषयी लिहितांना म्हटले आहे की, शिनजियांग प्रांतात वर्ष २०२० मध्ये मुख्यत: उघूर मुसलमान आणि इतर जातीय अन् धार्मिक अल्पसंख्य गटांविरुद्ध झालेला नरसंहार हा मानवतेविरुद्धचा गुन्हा होता