आज झाला आम्हा आनंदीआनंद । ‘ज्योती’ झाली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी मुक्त ॥

१७.२.२०२० या दिवशी पुणे येथील साधिका सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले. त्या वेळी पुणे येथील साधिकांना सुचलेल्या कविता येथे दिल्या आहेत.

सौ. ज्योती दाते

आज झाला आम्हाला आनंदीआनंद ।
‘ज्योती’ झाली जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतूनी मुक्त ॥ १ ॥

गुरुदेवांच्या हातातील दिव्य ज्योतीत ।
आणखी एक साधकरूपी ज्योत झाली विलीन ॥ २ ॥

नेतृत्व, सभाधीटपणा, नियोजनकौशल्य अन् समजूतदारपणा ।
या गुणांनी युक्त, अनेकांना साधनेत आणणारी जणू माऊली ती ॥ ३ ॥

आध्यात्मिक परिवाराचा वारसा लाभला तिला ।
संत अन् उन्नत साधक हे कुटुंबीय लाभले तिला ॥ ४ ॥

अखेर तिनेही भाववृद्धीने हरवले बुद्धीला ।
अन् पार केला जन्म-मृत्यूचा फेरा ॥ ५ ॥

‘गुरुदेवांना आनंद द्यायचा’, या विचाराने केले प्रयत्न ।
आणि ‘ज्योती’ झाली जीवनमुक्त ॥ ६ ॥

प्रतीक्षा होती साधकांना याच क्षणाची ।
मिळता सुवार्ता दासनवमी(टीप १) साजरी झाली ॥ ७ ॥

टीप १ : दासनवमीला सौ. ज्योती दाते यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित करण्यात आले.

– सौ. वसुधा योगेश डिंबळे, पुणे

पुण्यनगरीतील पहिल्या साधिका सौ. दातेकाकू झाल्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त ।

पुण्यनगरीतील पहिल्या साधिका ठरल्या ।
डॉ. दातेकाकांना साधनेत साहाय्य करू लागल्या ॥ १ ॥

नोकरी सोडून पूर्णवेळ साधिका झाल्या ।
प्रसारात झोकून देऊन कार्यरत झाल्या ॥ २ ॥

साधनापथावर नित्य निरपेक्ष चालत राहिल्या ।
सेवा चिकाटीने परिपूर्ण करू लागल्या ॥ ३ ॥

सेवेसह व्यष्टी साधनेचा ध्यास त्यांना लागला ।
अशा आमच्या दातेकाकू गुरुदेवांच्या लाडक्या झाल्या ।
अन् जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या ॥ ४ ॥

– सौ. गौरी अभिजीत कुलकर्णी, पुणे

देव भावाचा भुकेला ।

देव भावाचा भुकेला ।
भाव तेथे देव असे ॥

सत्य हे साधका कळण्या ।
भावसत्संगाचे नियोजन असे ॥ १ ॥

देव सगुण कि निर्गुण ।
बुद्धीने कसे घेणार जाणून ॥

भावच हे द्वंद्व मिटवी ।
अंतरी ती साक्ष देई ॥ २ ॥

अशा या भावसत्संगाचे ।
नियोजनही दैवी असे ॥
जाणीव असू दे सदा उरी ।
गुरुमाऊलींचीच ही प्रीती खरी ॥ ३ ॥

घनघोर अशा या आपत्काळात ।
भवसागर तो तरून जाण्यास ॥
भावसत्संगाची नाव असे ।
पैलतिरी ती नेऊन सोडे ॥ ४ ॥

असूया सदैव गुरुचरणी ऋणी ।
त्यांच्याच कृपेने भाव जागृत राही ॥ ५ ॥

(भाववृद्धी सत्संग ऐकून सुचलेली कविता)

– सौ. ज्योती दाते, पुणे (१४.१२.२०१६)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक