भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

काबूल (अफगाणिस्तान) – इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांनी जलालाबाद येथे अकाशवाणी आणि दूरचित्रवाणी केंद्रांवर काम करणार्‍या ३ महिलांची हत्या केली, तर एक महिला घायाळ झाली. या तिघीही १८ ते २० वयोगटातील होत्या. कार्यालयातून घरी जात असतांना त्यांच्यावर आक्रमण करण्यात आले.

या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक आणि मालिका यांचे स्थानिक भाषा दारी अन् पश्तू यांमध्ये भाषांतर करत होत्या. पोलिसांनी आक्रमण करणार्‍या आतंकवाद्यांना पकडले असून त्यांनी ते ‘तालिबानी’ असल्याचे म्हटले आहे; मात्र तालिबाने या आक्रमणामागे त्यांचा हात असल्याचा आरोप फेटाळला आहे. त्यानंतर इस्लामिक स्टेटने त्याचे दायित्व स्वीकारले आहे.