‘मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यासाठी आले होते. एकदा मी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत बसून नामजप करतांना देवाने विचार दिला, ‘समोर असलेल्या कपाटातील खणांकडे बघून नामजप करतांना काय वाटते ?’, ते बघ.’ तेव्हा मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. माझ्या डाव्या बाजूच्या कपाटाच्या वरच्या खणाकडे बघितल्यावर माझा ‘ॐ’चा जप चालू झाला आणि मनात परात्पर गुरु डॉक्टरांविषयी विचार आले.
२. माझ्या डाव्या बाजूच्या कपाटाच्या खालच्या खणाकडे बघितल्यावर माझ्यावर उपाय झाले. मला पुष्कळ जांभया आल्या आणि माझ्या मनात शरणागतीचे विचार आले.
३. माझ्या उजव्या बाजूच्या कपाटाच्या वरच्या खणाकडे बघितल्यावर नामजप करतांना मला मणिपुरचक्राच्या ठिकाणी आणि डोक्यात संवेदना जाणवल्या.
४. माझ्या उजव्या बाजूच्या खालच्या खणाकडे बघितल्यावर मला दोन्ही बाजूच्या कानशीलांत संवेदना जाणवली. माझ्या मनात क्षमायाचनेचे विचार आले. मला शांत वाटले आणि उपाय होऊन जांभया आल्या.
५. मी कपाटाच्या मधल्या खणाकडे बघितल्यावर ‘मधला खण ध्यानस्थ आहे’, असे मला वाटले. मला त्या खणाकडे बघवत नव्हते. मी प्रार्थना केल्यावर मला त्या खणाकडे बघता आले. मी ‘त्यातील चैतन्य सहन होऊ दे’, अशी प्रार्थना केली. माझा श्वास संथ गतीने चालू झाला आणि ‘श्वासासह नाम आत जात आहे’, असे मला जाणवले.
६. आरशाकडे बघून नामजप करतांना ‘आरशाचा श्वास चालू आहे’, असे मला वाटले.
७. प.पू. भक्तराज महाराज यांनी वापरलेल्या पलंगाकडे बघून नामजप करतांना माझे मन एकाग्र झाले नाही. मला त्याकडे बघवत नव्हते.
– सौ. जयश्री पाटील, नेरूळ, नवी मुंबई. (१५.२.२०१७)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |