नवरात्रातील भाववृद्धी सत्संगात श्री चंद्रघंटादेवीविषयी सांगत असतांना सिंहारूढ देवी घरी आली असून सिंहराज देवघरातील देवींच्या चित्रांजवळ जाऊन बसल्याचे दिसणे आणि पुढील ३ दिवस देवघरात सिंहराजांचे अस्तित्व जाणवणे
‘वर्ष २०२० मध्ये नवरात्रातील भाववृद्धी सत्संगात तिसर्या दिवशी श्री चंद्रघंटादेवीविषयी माहिती सांगत होते. तेव्हा देवीच्या आगमनापूर्वी शंख आणि घंटा नाद झाला. तो ऐकतांना माझ्या अंगावर रोमांच येत होते. ती अवस्था नंतर बराच काळ टिकून राहिली. आम्ही पहिल्या माळ्यावर रहातो. त्यानंतर मला दिसले, ‘सिंहारूढ देवी जिना चढून वर आली. देवी दारात उभी असून आम्ही चौघांनी (माझे यजमान, मी आणि दोन मुली) देवीचे औक्षण केले. यजमान सिंहाची पूजा करत होते. सिंहराज घरात येण्यास अतिशय उतावीळ होते. औक्षण झाल्यावर ते देवघरात आले. आमच्या देवघरात कुलदेवी रेणुकामाता, अमरावतीची अंबामाता आणि सरस्वतीमाता, या देवींची चित्रे आहेत. सिंहराज देवींच्या चित्राजवळ जाऊन बसले आणि मग शांत झाले. पुढे तीन दिवस देवघरात सिंहराजाचे अस्तित्व जाणवत होते.’
– एक साधिका (२३.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |