गुजरात सरकारही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार !

असे एकेक राज्यांनी ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करण्यापेक्षा केंद्र सरकारनेच थेट देशपातळीवर सर्वांसाठी कायदा करावा, असेच हिंदूंना वाटते !

कर्णावती (गुजरात) – हिंदु मुलींचे अपहरण आणि धर्मांतर करण्यासाठी सरकार ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा करणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी एका सभेमध्ये दिली. यापूर्वी भाजपशासित उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यांत हा कायदा करण्यात आला आहे.

रूपाणी म्हणाले की, विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून चालू होत असून ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदु मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे.