बँकेला लॉकरचे दायित्व झटकता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालय

 हे न्यायालयाला का सांगावे लागते ? बँकांना का कळत नाही कि केवळ नफा मिळवणेच हा त्यांचा उद्योग आहे ?

नवी देहली – बँकेमध्ये लॉकर भाड्याने घेऊन त्यात दागदागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे ठेवली जातात. त्यामुळे कोणतीही बँक स्वतःचे दायित्व झटकून ग्राहकांची झालेली हानी भरून देण्यासाठी हात वर करू शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयाने म्हटले की,

१.  ग्राहकांच्या संपत्तीची योग्य काळजी घेऊन ती सुरक्षितपणे सांभाळली जावी, यासाठी लॉकरची योजना आहे. बँकेच्या लॉकरला काही झाल्यास त्या बँकेची विश्‍वासार्हता धोक्यात येते. बँकेची विश्‍वासार्हता अबाधित रहावी, यासाठी लॉकरसाठी निश्‍चित नियमावली ६ मासांत जारी करावी.

२. आपण वेगाने कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे जात असल्यामुळे नागरिक आता घरात रोकड ठेवण्यास तितकेचे उत्सुक नसतात. यामुळे बँकांमधून लॉकरची मागणी वाढत आहे. त्यातच तंत्रज्ञान अधिक आधुनिक होत चालल्यामुळे चावीच्या लॉकरकडून आपला प्रवास आता इलेक्ट्रॉनिक लॉकरकडे होऊ लागला आहे. अशावेळी तंत्रज्ञानाचा अपलाभ घेत लॉकर चोरीचे प्रमाण वाढू लागले आहे. ग्राहकाला अंधारात ठेवून भामटे लॉकरवर डल्ला मारत आहेत.