साहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलीस हवालदाराची आत्महत्या

आत्महत्या करणारे पोलीस असणारे प्रशासन दुर्बलच नव्हे का ?

नवी मुंबई – दोन दिवसांपूर्वी ए.पी.एम्.सी. पोलीस ठाण्यातील साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच १५ फेब्रुवारीच्या रात्री एका हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल येथे घडली आहे. संतोष नामदेव पाटील (वय ४७) असे मृत हवालदाराचे नाव आहे. यामुळे नवी मुंबई पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण पवार यांनी कर्तव्यावर असताना स्वतःकडील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. संतोष पाटील हे खारघर पोलीस ठाण्यात नेमणुकीला होते. आत्महत्येच्या वेळी पत्नीसह दोन मुली घरातच होत्या. त्याच सोसायटीमध्ये रहाणारे पोलीस हवालदार सतीश पवार यांनी त्यांना तातडीने तेरणा रुग्णालयात येथे उपचार करण्यासाठी आणले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे. संतोष पाटील हे काही दिवसांपासून आजारी असल्याने कामावर जात नव्हते.