बदायू (उत्तरप्रदेश) येथे मंदिराच्या वृद्ध पुजार्‍याची हत्या

राज्यात २० दिवसांत दुसरी घटना

उत्तरप्रदेशात भाजपचे राज्य असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

(चित्र सौजन्य : दैनिक भास्कर)

बदायू (उत्तरप्रदेश) – येथील मोहजुद्दीनगर ढकनगला गावात मंदिरात ‘सखी बाबा’नावाने प्रसिद्ध असलेले ७५ वर्षीय पुजारी जयसिंह यादव यांची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी रामवीर यादव याच्यावर संशय असून तो पसार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी ३ पथके स्थापन केली आहेत. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

१. सखी बाबा येथेच एका झोपडीत अनेक वर्षांपासून रहात होते. ६ फेब्रुवारील रामवीर यादव त्यांना भेटण्यासाठी आला होता. या वेळी त्यांच्यात वाद होऊन रामवीर याने चाकूने बाबांची हत्या करून पलायन केले. या वेळी गावकर्‍यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो पळून गेला.

२. २० जानेवारीला राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी जवळील शिवपूर येथे शिवमंदिरातील फकीरे दास या ८५ वर्षीय पुजार्‍याचीही धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. यामागे चोरीचा उद्देश नसल्याचे उघड झाले होते.