कोरोना विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सांगितलेल्या नामजपाविषयी सुचलेली सूत्रे

‘काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात आत्मबळ निर्माण होण्यासाठी विषाणूंपासून रक्षण होण्यासाठी सर्वांना एक नामजप करण्यास सांगितला आहे. त्यामध्ये ३ वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’, १ वेळा ‘श्री गुरुदेव दत्त ।’, पुन्हा ३ वेळा ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ आणि शेवटी १ वेळा ‘ॐ नमः शिवाय ।’ असा नामजप करायचा आहे. त्या संपूर्ण नामजपाचा मला पुढील भावार्थ सुचला. हा नामजप करत असतांना सुचल्याप्रमाणे संबंधित संतांचे स्मरण केल्यावर मनाला शांत आणि आनंददायी वाटू लागले.

१. नामजपाशी संबंधित संत

अ. श्री दुर्गादेवी : श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

आ. दत्तगुरु : परात्पर गुरु डॉ. आठवले (परात्पर गुरु या नात्याने ते साक्षात् दत्तगुरुच आहेत.)

इ. श्री दुर्गादेवी : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

ई. शिव : परात्पर गुरु डॉ. आठवले (महर्षींनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेव शिवस्वरूप आहेत, तसेच ते बहुतेकदा शिवदशेतच असतात’, असे अनेकदा सांगितले आहे.)

२. नामजप करतांना ‘कुणाचे स्मरण करावे ?’, याविषयी सुचलेली सूत्रे

मला पुढीलप्रमाणे सुचले, ‘या संपूर्ण नामजपात ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ हा श्री दुर्गादेवीचा तीनदा नामजप दोन वेळा करायचा आहे. त्यामध्ये एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि एकदा श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे स्मरण करावे; कारण त्या दोघी एकाच शक्तीची दोन रूपे आहेत. दत्त आणि शिव यांच्या नामजपाच्या वेळी परात्पर गुरुदेवांचे स्मरण करावे; कारण सर्व देवता त्यांच्यातच सामावलेल्या आहे. हा पूर्ण नामजप आपत्काळात उपयुक्त आहे, म्हणजे आपत्काळात परात्पर गुरु डॉक्टर आणि सद्गुरुद्वयी यांच्या मार्गदर्शनामुळे, तसेच त्यांच्यातून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांमुळेच साधकांचे अन् संपूर्ण संसाराचे रक्षण होणार आहे.’

– श्री. निमिष म्हात्रे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक