गुरुचरणी प्रार्थना ।

स्वप्न अपुरे माझे ।
तुम्हासवे पुरे व्हावे ।

श्री. नयन गुंजावळे

होऊनी माझ्या अंतरातील परमात्मा ।
तुम्ही विद्येचे दान द्यावे ।। १ ।।

भेटूनी तुम्हा जन्मोजन्मीचे पुण्य लागेल सत्कर्मी ।
हे भगवंता (टीप), मज पुनःपुन्हा जन्माला घालावे ।
याच तुमच्या पावन नगरीत ।। २ ।।

आभाळाहूनही व्यापक तुमची माया ।
सतत तारते आम्हाला भवसागर पार कराया ।। ३ ।।

एकच प्रार्थना भगवंता तुमच्या चरणी ।
ब्रह्मांडाएवढी तुमची व्यापकता ।
त्यात तिळाएवढा तरी माझा वास असू दे ।। ४ ।।

टीप : परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. नयन गुंजावळे (धर्मप्रेमी), सातारा (३०.१२.२०२४)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमींच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक