‘Our STARS’ या गटाने आणि दोन आधुनिक वैद्यांनी ॲनिमेशनद्वारे सांताक्लॉज ‘भरतनाट्यम्’ नृत्य प्रस्तुत करत असल्याचे चलत्’चित्र प्रसारित करून ‘भरतनाट्यम्’ या भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबन करणे !
१. ‘भरतनाट्यम्’ या भारतीय शास्त्रीय नृत्याचा इतिहास आणि महत्त्व
‘भरतनाट्यम्’ हे भारतीय शास्त्रीय नृत्य आहे. या नृत्याची निर्मिती शिव आणि पार्वती यांच्यापासून झालेली असून ते भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर आधारित आहे. ‘भरतनाट्यम्’ हे नृत्य सात्त्विक असून ही नृत्यकला मूळ दक्षिण भारतातील आहे. प्राचीन काळापासून हे नृत्य देवतेच्या मंदिरात देवाच्या चरणी नृत्यसेवा अर्पण करण्यासाठी केले जात होते. त्यामुळे विविध देवतांच्या भक्तीगीतांवर हे नृत्य प्रस्तुत केले जाते. त्यामुळे ‘हे नृत्य सादर करणे’ म्हणजे, देवाची उपासना करणेच होय.
भरतनाट्यम् नृत्य सात्त्विक संगीत किंवा नृत्याशी संबंधित विशिष्ट बोल यांवर सादर केले जाते. यांतील प्रत्येक मुद्रेला विशिष्ट अर्थ आणि महत्त्व आहे. प्रत्येक मुद्रा विशिष्ट पद्धतीने करण्याचा नियम आहे. अशा प्रकारे ‘भरतनाट्यम्’ हे नृत्य मनोरंजनासाठी नसून कला जपण्यासाठी आणि ही कला भगवंताच्या चरणी अर्पण करण्यासाठी सादर केले जाते.
२. रज-तम प्रधान वृत्तीच्या माणसांकडून ‘भरतनाट्यम्’ सारख्या सात्त्विक कलेचे विडंबन केले जाणे
सध्या कलियुग चालू असल्याने पृथ्वीवरील मनुष्याची सात्त्विकता पुष्कळ प्रमाणात न्यून होऊन त्यांच्यामध्ये रज-तम प्रधान गुण वाढले आहेत. त्यामुळे मनुष्याचा केवळ स्थूल देहच नव्हे, तर त्याचे मन आणि बुद्धी पूर्णपणे दूषित झाले आहेत. या दूषित मनातून विकृत कलेची निर्मिती होते. ही कला मूळ कलेला विकृत स्वरूपात सादर करते. त्यामुळे मूळ कलेची मूलतत्त्वे बाजूला राहून कलेचे विडंबन होऊन कलेचा अपमान होतो. अशा प्रकारे सध्या ‘भरतनाट्यम्’ या प्राचीन भारतीय शास्त्रीय नृत्याचे काही जण विडंबन करून तिला विकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
३. ॲनिमेशनद्वारे सांताक्लॉजने भरतनाट्यम् नृत्य प्रस्तुत करून भरतनाट्यम् नृत्याचे विडंबन करणे
‘Our STARS’ या गटाने ख्रिसमस (नाताळ) आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी ॲनिमेशनद्वारे सांताक्लॉजने ‘भरतनाट्यम्’ नृत्य करणारे एक ‘Santa Clause dng (हे नाव संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) BharatNatyam (traditional dance)’, या नावाची चलत्’चित्र ‘यू ट्यूबवर’ प्रसिद्ध केले आहे.
३ अ. घुंगरू परिधान करणे : सांताक्लॉजने भरतनाट्यम् नृत्यात परिधान करतात त्याप्रमाणे पायांत घुंगरू बांधले आहेत.
३ आ. भरतनाट्यम् या नृत्याच्या पोषाखाचे विडंबन करणे : पुरुष नर्तक भरतनाट्यम् नृत्य सादर करतांना ज्याप्रमाणे वेगवेगळ्या रंगांचे धोतर नेसतात, त्याप्रमाणे सांताक्लॉजने पँट न घालता लालसर रंगाची छटा असणारे धोतर नेसले आहे. यावरून त्याने भरतनाट्यम् पोशाखाचेही विडंबन केले आहे.
३ इ. सांताक्लॉजने भरतनाट्यम् नृत्यातील अनेक मुद्रा करणे : सांताक्लॉजने भरतनाट्यम् नृत्यातील अनेक मुद्रा करून भरतनाट्यम् नृत्याचे विडंबन केले आहे.
३ ई. चलत्’चित्रात भरतनाट्यम्’चे बोल कसेही म्हटलेले असणे : जेव्हा सांताक्लॉज भरतनाट्यम् नृत्य प्रस्तुत करतो, तेव्हा पार्श्वसंगीत आणि भरतनाट्यम् नृत्याचे ‘ताक् धिनक चुन ताक्, धुम तनन तनन, धुम धुम तनन तनन धुम धुम अगप्पा’ अशा प्रकारचे भरतनाट्यम् नृत्यातील बोल कसेही म्हटले आहेत.
३ उ. सांताक्लॉजने नृत्यातून विविध हावभाव करणे : ‘वर्ष २०२० मध्ये कोरोना आल्यामुळे जगभरातील लोकांवर रडण्याची पाळी आली’, असे सांताक्लॉजने नृत्यातील मुद्रा आणि हावभाव यांतून दाखवले.
३ ऊ. सांताक्लॉजसह दोन वैद्यांनीही भरतनाट्यम् नृत्याचे विडंबन करणे : त्यानंतर ‘वर्ष २०२१ च्या आगमनाने दोन वैद्यांनी ‘कोरोना प्रतिबंधक लस’ सिद्ध केल्याचे आणि ही अनोखी भेट सांताक्लॉजने सर्वांना ख्रिसमच्या निमित्ताने दिलेली आहे’, असे चित्र दाखवून दोन्ही वैद्यांनी सांताक्लॉजसह भरतनाट्यम् नृत्य करून आनंद व्यक्त केल्याचे दाखवण्यात आले आहे. तेव्हा यमदेव हातात छत्री घेऊन उलट्या दिशेने मागे चालत जातांना दाखवून यमदेवाचे विडंबन केले आहे.
३ ए. सांताक्लॉजसह दोन वैद्यांनी इंग्रजी गाण्यावर भरतनाट्यम् आणि ब्रेक डान्स करणे : या गाण्याचे बोल संपल्यावर त्याला ‘Shape of You’ या प्रसिद्ध इंग्रजी गाण्याचे पार्श्वसंगीत आणि गाण्याचे बोल देऊन त्यावर दोन वैद्यांसह सांताक्लॉज भरतनाट्यम् अन् ब्रेक डान्स यांच्या संमिश्र मुद्रा करून नाचतांना दाखवले आहे.
(स्रोत : IndianRaga)
|
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून हिंदु विरोधकांनी केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक)
४. पारंपरिक भरतनाट्यम् नृत्य आणि सांताक्लॉजने सादर केलेले ॲनिमेटेड विडंबनात्मक भरतनाट्यम् नृत्य पाहिल्यामुळे होणारे परिणाम
५. विडंबनात्मक कला सादर केल्यामुळे होणारी व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील हानी
अशा प्रकारे भरतनाट्यम् सारख्या भारतीय शास्त्रीय नृत्याचे विडंबनात्मक स्वरूप पाहिल्यावर चलत्’चित्र बनवणार्यांची आणि ते पहाणार्यांची पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिक हानी होते. त्याचप्रमाणे ‘नृत्य ही ईश्वरप्राप्ती करण्याची कला नसून ती केवळ मनोरंजनाचे साधन आहे’, ही चुकीची विचारसरणी प्रबळ होऊन व्यक्तीची व्यष्टी स्तरावर हानी होते. त्याचप्रमाणे अशा प्रकारे मानसिक स्तरावर सादर केलेल्या विडंबनात्मक नृत्यातून पाहिल्याने पहाणार्यांकडे ‘सात्त्विक नृत्याचे विडंबन करणे योग्य आहे’, असा चुकीचा संदेश समाजात जातो. त्यामुळे समाजाची म्हणजे, समष्टीची हानी होते.
६. सात्त्विक कलाकार अन् रसिक यांना आवाहन
सात्त्विक कलाकार आणि रसिक यांनी विडंबनात्मक कला सादर करणारे कलाकार अन् त्यांना प्रतिसाद देणारे रसिक यांना कलेच्या विडंबनामुळे होणार्या हानीविषयी जागृत केले पाहिजे. त्यांनी व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही स्तरांवर हानी करणार्या कृतींना विरोध करून सात्त्विक कृतींचा प्रसार केला पाहिजे.
प्रार्थना : ‘हे भगवंता, तू निर्माण केलेल्या विविध कला आम्हाला त्यांच्या मूळ सात्त्विक स्वरूपात जोपासण्याची सद्बुद्धी दे आणि या सर्व कला तुझ्या चरणी समर्पित होण्यासाठी आमच्याकडून तुला अपेक्षित अशी साधना आणि धर्माचरण होऊ दे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२०)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. |