छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी ज्याप्रमाणे मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ हिंदु धर्माच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. निधर्मीवादी सरकारांकडून, तसेच प्रशासन आणि पोलीस यांच्याकडून होणारा त्रास सहन करत ते निःस्वार्थ भावाने केवळ धर्मरक्षणासाठी दिवसरात्र संघर्ष करत आहेत. आज राष्ट्रविरोधी शक्ती निधर्मीवाद्यांच्या पाठिंब्याने बलवान होऊन हिंदुविरोधी षड्यंत्रे करत असतांना आपल्या मनात ‘हिंदूंचे पुढे काय होणार ?’, अशी चिंता वाटते. त्यावेळी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणार्या या मावळ्यांच्या, शिलेदारांच्या संघर्षाची उदाहरणे वाचल्यास निश्चितच आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल. त्याचसाठी या शिलेदारांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणारे ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ हे सदर ‘सनातन प्रभात’मध्ये लवकरच चालू करत आहोत.
वाचकांना आवाहन
आपल्यालाही अशा शिलेदारांची माहिती असल्यास ती ‘सनातन प्रभात’ला अवश्य पाठवा. यासाठी 99756 09648 या क्रमांकावर WhatsApp करा !