काळ्या जादूचा प्रकार, केबिनच्या फरशीखाली हाडे, मानवी केस सापडले !
मुंबई – येथील लीलावती रुग्णालयात गेल्या २० वर्षांत १ सहस्र २५० कोटी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ट्रस्टने १७ जणांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट केला आहे. यामध्ये ७ माजी विश्वस्त, उपकरण पुरवठादार आस्थापने आणि विक्रेते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी बहुतांश जण दुबई आणि बेल्जियम येथे स्थायिक असलेले अनिवासी भारतीय आहेत. ट्रस्टच्या माजी कर्मचार्यांनी काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काळी जादू, अघोरी कर्मकांड केल्याची माहिती दिली होती. संबंधित कार्यालयात खोदकाम केले असता रुग्णालयातील केबिनच्या फरशीखाली ८ कलश मिळाले. त्यामध्ये मानवी हाडे, केस आणि जादुटोण्याचे अन्य सामान आढळले. (याविषयी रुग्णालय प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे ! – संपादक)