कल्याण येथील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण
मुंबई – कल्याण पूर्व परिसरात १३ वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पीडितेची बाजू मांडण्याचे दायित्व विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम यांच्याकडे देण्यात आले आहे. ठाणे पोलीस आयुक्तांना ३० दिवसांत दोषारोपपत्र प्रविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीडित मुलगी माझ्या मुलीसारखी आहे. त्यामुळे तिला न्याय मिळवून देण्याचे दायित्व माझे आहे. दोषींना ४ महिन्यांत कठोर शिक्षा दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजित मिश्रा आणि कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी २८ डिसेंबर या दिवशी पीडितेच्या कुटुंबियांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अमरजित मिश्रा यांनी पीडितेच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक साहाय्य म्हणून १ लाख रुपयांचा धनादेश दिला.