प्लॅटफॉर्म तिकिटांवर तात्पुरते निर्बंध ! 

मुंबई – नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाढती गर्दी पहाता रेल्वेस्थानकांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्रीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. हे निर्बंध २९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असतील.

वयोवृद्ध व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशांचा प्रवास सुलभ व्हावा, या हेतूने निर्बंधांमधून सवलत दिली आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट प्रतिबंधित असलेली १४ रेल्वेस्थानके ! 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुर्गी, लातूर