‘एम्.एम्.आर्.डी.ए.’च्या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या कंत्राटदारांकडून ५ ते २० लाखांपर्यंत दंड आकारणार !

मुंबई – मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात (‘एम्.एम्.आर्.’) वायू प्रदूषण वाढत आहे. हवेचा दर्जाही खालावला आहे. याला पायाभूत सुविधा विकास प्रकल्प आणि बांधकाम प्रकल्प कारणीभूत आहेत. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पस्थळावरील वायू प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’ने (‘एम्.एम्.आर्.डी.ए.’ने) राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुढाकार घेऊन वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली सिद्ध करण्यात आली आहे. ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’च्या प्रकल्पस्थळी या नियमावलीचे उल्लंघन करणार्‍या कंत्राटदारांकडून ५ लाखांपासून २० लाखांपर्यंतचा दंड आकारण्यात येणार आहे.