हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि त्यासाठी अवतारी कार्य करणार्‍या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची तळमळ !

‘विश्‍वातील अनेक समस्यांनी मानवी समाजासह अवघ्या सृष्टीला ग्रासलेले आहे. या समस्यांना एकेक करून सामोरे जातांना त्यावर काढलेली उपाययोजना ही तात्कालिक ठरल्याचे अनेक उदाहरणांतून आपल्या लक्षात येते. अशा वेळी ‘अधर्माचरण हेच सर्व समस्यांचे मूळ आहे’, हे लक्षात येते. यावर उपाय म्हणजे धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण करणे होय. अशा प्रकारे धर्माचरण केल्याने रामराज्यात केवळ राजाच नव्हे, तर प्रजाही आनंदी होती. एके काळी अवघ्या विश्‍वाचा आध्यात्मिक गुरु असलेल्या भारताची संपूर्ण विश्‍वाला धर्मशिक्षण देऊन रामराज्य म्हणजे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. हे अनेक संत, द्रष्टे आणि भविष्यवेत्ते यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे. आध्यात्मिक पाया असलेले हे ईश्‍वरनियोजित हिंदु राष्ट्र अवतरण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले रात्रंदिवस झटत आहेत. त्यांच्या तळमळीमुळेच अनेक असाध्य गोष्टी सहजसाध्य होत असून अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीला धर्मरक्षणाची सुवर्णसंधी लाभत आहे. त्यामुळे ‘त्यांनीच हे धर्मकार्य आम्हासारख्या पामरांकडून करवून घ्यावे, ही श्रीकृष्णचरणी प्रार्थना !’

– एक धर्मशिक्षणवर्गसेवक