स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला १० ‘इलेक्ट्रिक केटल्स’ सुपुर्द

रत्नागिरी – जिल्ह्यात वाढती कोरोनाबाधित रुग्ण संख्या लक्षात घेऊन येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक असलेली १० विद्युत् किटली (इलेक्ट्रिक केटल्स) जिल्हा रुग्णालयाचे प्रभारी डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे सुपुर्द करण्यात आली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे वैद्यकीय कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला. त्याच वेळी स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अधिवक्ता दीपक पटवर्धन यांनी ‘इलेक्ट्रिक केट्ल्स’ चे १० नग रुग्णालयात दिले आणि जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका आणि अन्य कर्मचारी यांना ते करत असलेल्या अथक कामाविषयी मनःपूर्वक धन्यवाद दिले.

या वेळी अधिवक्ता दीपक पटवर्धन म्हणाले, ‘‘कोरोनाच्या या संकटकाळात सर्वांत महत्त्वाची सेवा शासकीय जिल्हा रुग्णालय देत आहे. सामाजिक जाणीव सदैव जागृत ठेवणारी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था जिल्हा रुग्णालयाच्या आवश्यकतेनुसार आवश्यक ते सहकार्य करण्यासाठी तत्पर राहील आणि रुग्णालयाला आवश्यक ते सहकार्य करेल.’