ट्विटरवरून टिक-टॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याची मागणी

#BanTikTok हा हॅशटॅग राष्ट्रीय ट्रेंडमध्ये शीर्ष स्थानावर !

तरुणींवर आम्ल फेकण्यासाठी प्रोत्साहित करणारा व्हिडिओ प्रसारित केल्याने कथित टिक-टॉक स्टार फैजल सिद्धीकी यास लोकांचा विरोध

  • धर्मांधांची विकृत मानसिकता जाणा ! अशांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी !
  • टिक-टॉक हा मनोरंजनाचे नव्हे, तर जीवघेण्या आणि किळसवाण्या विकृतीचे केंद्र बनले असतांना सरकार त्यावर बंदी का घालत नाही ?

नवी देहली – ट्विटरवरून #BanTikTok हा हॅशटॅग १८ मे या दिवशी राष्ट्रीय ट्रेंडमध्ये शीर्षस्थानी होता. कथित टिक-टॉक स्टार फैजल सिद्धीकी याने यावर एक व्हिडिओ प्रसारित करून तरुणींवर आम्ल फेकण्याच्या कृत्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास लोकांनी विरोध केला. त्यानंतर हा ट्रेंड चालू झाला. टिक-टॉकवर बंदी घालण्याची मागणी करण्यासह तो भ्रमणभाषमधून काढून टाकण्याचे आवाहनही करण्यात आले.

१. भाजपचे नेते तेजिंदर पाल बग्गा यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांना फैजल सिद्धीकी यांचा हा व्हिडिओ पाठवला. त्यानंतर शर्मा यांनी तो टिक-टॉक इंडिया आणि पोलीस यांना पाठवला. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडिओ टिक-टॉकवरून काढून टाकण्यात आला.

२. या व्हिडिओमध्ये एका मुलीवर पाणी फेकण्यात येत असल्याचे दिसत असून नंतर ते पाणी नसून आम्ल आहे, असे सांगितले जाते. पुढच्या दृश्यात या तरुणीचा तोंडवळा भाजल्याचे दाखवण्यात आले आहे.