अक्षय्य तृतीयेला सात्त्विकतेच्या प्रक्षेपणामुळे चांगले वाटण्याचे सरासरी प्रमाण ६० ते ७० टक्के इतके असते, तर पूर्वजांचा त्रास होण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के इतके असते. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला देवता आणि पूर्वज यांना केलेल्या तीलतर्पणामुळे साधकावरील देवऋण आणि पितरऋणही काही प्रमाणात न्यून होण्यास साहाय्य होते. साधकाने प्रामाणिकपणे, मनापासून आणि भावपूर्णरीत्या तीलतर्पण केल्यास देवता आणि पूर्वज त्याच्यावर प्रसन्न होतात अन् त्याला साधना चांगली होण्यासाठी आणि व्यवहारातील अडचणी दूर होण्यासाठी आशीर्वाद देतात. – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, १०.५.२००५)