जबलपूर (मध्यप्रदेश) येथे दळणवळण बंदी असतांनाही काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून हत्या

दळणवळण बंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडत असतील, तर सर्व व्यवहार चालू असतांना किती गुन्हे घडत असतील ?

जबलपूर (मध्यप्रदेश) – येथे काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची दिवसाढवळ्या आणि दळणवळण बंदी असतांनाही गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपी मोनू सोनकर याने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. आपसांतील वादामुळे त्याने हत्या केल्याची स्वीकृती दिली. धमेंद्र सोनकर असे या माजी नगरसेवकाचे नाव आहे. मोनू याच्यावर यापूर्वीही हत्येचा गुन्हा नोंद असून त्यात तो सध्या जामिनावर सुटला होता.